दारव्हा तालुक्यात अतिवृष्टीमुळे शेतकरी हवालदिल झाले असून शेतीपिकांचे नुकसान होत आहे. शेतात साचलेल्या पाण्यामुळे शेतकऱ्यांच्या भविष्याबद्दल गंभीर चिंता निर्माण झाली आहे. या चिंतेतूनच तालुक्यातील डोल्हारी येथील अडाण अडाण नदीच्या पुरात शहापूर येथील एका तरुणाने उडी मारून आत्महत्या केल्याची हृदयद्रावक घटना दि. २८ सप्टेंबर ला दु. ४ वा.घडली. अशी माहिती दारव्हा पोलिसांनी आज दिनांक २९ सप्टेंबरला दुपारी बारा वाजता दरम्यान प्रसिद्धी पत्रकाद्वारे माध्यमांना दिली आहे