वडवणी शहरात, मराठा समाजाच्या कार्यालयात आज मंगळवार, दिनांक 26 ऑगस्ट रोजी दुपारी 12 वाजता पत्रकार परिषद झाली. मराठा आरक्षणासाठी लढा देणारे नेते, मनोज जरांगे पाटील यांनी येत्या 29 ऑगस्ट रोजी मुंबईच्या आझाद मैदानावर आंदोलनासाठी जनतेला आवाहन केले आहे. त्यासाठी ही पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती. दरम्यान, उद्या बुधवार, दिनांक 27 ऑगस्ट रोजी सकाळी सात वाजता वडवणी शहरातील अण्णाभाऊ साठे चौकातून मराठा समाज बांधव अंतरवली सराटीकडे कुच करणार आहेत. त्यामुळे सर्वांनी वेळेत उपस्थित राहावे, असे