राज्यात वृक्षाच्छादन वाढविण्यासाठी "हरित महाराष्ट्र, समृद्ध महाराष्ट्र" या अभियानांतर्गत वर्ष 2025 करीता राज्याकरीता 10 कोटी वृक्ष लागवड मोहीम लोक चळवळ म्हणुन राबविण्याबाबत मुख्यमंत्री महोदयांनी निर्देशित केले आहे. त्यानुसार "हरित महाराष्ट्र, समृद्ध महाराष्ट्र" अभियानांतर्गत यवतमाळ जिल्ह्याचे वृक्षलागवडीचे उद्दीष्ट 5622500 निश्चित करण्यात आले असून, आजरोजीपर्यंत जिल्ह्याचे 1945602 इतके उद्दीष्ट पुर्ण करण्यात आलेले आहे.