महाराष्ट्रातील भावी आंतरराष्ट्रीय व्यवसाय आणि वित्तीय केंद्र म्हणून "नवीन नागपूर" या भव्य प्रकल्पाला गती मिळाली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत आज नागपूर महानगर क्षेत्र विकास प्राधिकरण आणि केंद्र सरकारच्या नवरत्न दर्जाच्या दोन सार्वजनिक कंपन्या – एनबीसीसी (इंडिया) लिमिटेड आणि हुडको यांच्यात दोन महत्त्वपूर्ण सामंजस्य करार करण्यात आले.