यूवांगण गणेश उत्सव मंडळ कूरखेडा यांचा वतीने स्थापीत कूरखेडा चा राजा या गणरायाला आज दि.७ सप्टेबंर रविवार रोजी वाजत गाजत शहरातून मिरवणूक काढत सती नदीचा प्रवाहात रात्री १० वाजेचा सूमारास विसर्जित करीत भावपूर्ण निरोप देण्यात आला. शहराचा वार्ड क्र.४ येथे कूरखेडाचा राजा गणरायाला याला कलात्मक रीत्या केदारनाथ मंदिराचा देखावा तयार करीत विधीवत स्थापीत करण्यात आले होते येथे मागील दहा दिवसा पासून नियमित आरती पूजा किर्तन तसेच सामाजिक उपक्रमाचे आयोजन करण्यात येत होते.