राज्य शासनाने दिलेल्या १५० दिवसांच्या सेवा कार्यक्रमातंर्गत जिल्हाधिकारी कार्यालयात अनुकंपा पदभरती मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या मेळाव्याला निवासी उपजिल्हाधिकारी लीना फलके उपस्थित होत्या. उपलब्ध अनुकंपा पदाचे विवरणपत्र व सविस्तर माहिती यावेळी फलकाव्दारे नियोजन भवन येथे उमेदवारांना दर्शविण्यात आली. या अनुकंपा पदभरती मेळाव्यात गट 'क' च्या उमेदवारांच्या नियुक्तीचे धोरणाची अंमलबजावणी करणेबाबत एकुण प्रतिक्षा यादीमध्ये 79 उमेदवारांचा समावेश होता.