पंचायत समितीसमोर भागवत सांगळे यांचे आठव्या दिवशीही आमरण उपोषण सुरू संगमनेर तालुक्यातील सोनेवाडी येथे अवैधरित्या सुरू असलेल्या स्टोन क्रशरविरोधात ग्रामस्थांचा संघर्ष सुरूच आहे. या प्रकरणी सोनेवाडीतील भागवत बाबुराव सांगळे यांनी पंचायत समितीसमोर आमरण उपोषण सुरू केले असून, आज आठव्या दिवशीही त्यांचे आंदोलन कायम आहे.