गडचिरोली जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्री. निलोत्पल यांच्या निर्देशानुसार, वाहतुकीला शिस्त लावण्यासाठी आणि अपघातांचे प्रमाण कमी करण्यासाठी आलापल्ली शहरात वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात आली आहे. याच मोहिमेअंतर्गत, आलापल्ली पोलिसांनी १२ अल्पवयीन दुचाकी चालकांवर दंडात्मक कारवाई करून त्यांच्या गाड्या जप्त केल्या.गडचिरोली पोलीस अधीक्षक श्री. निलोत्पल यांनी जिल्ह्यामध्ये बेजबाबदार वाहन चालकांवर कठोर कारवाई करण्याचे आदेश दिले होते.