भंडारा जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ पंकज भोयर यांनी जिल्ह्यातील तालुका स्थरावर प्रत्येक आठवड्यातील पहिल्या सोमवारी जनता दरबार घेण्याचे आदेश दिले. त्यानुसार लाखनी तहसीलमध्ये ८ सप्टेंबर रोजी सकाळी १० ते दुपारी १ वाजताच्या सुमारास जनता दरबाराचे आयोजन करण्यात आले होते. तहसील कार्यालयात आयोजित जनता दरबारात लाखनी तालुक्यातील नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असून नागरिकांच्या समस्यांचे निराकण होईल असा विश्वास स्थानिक नागरिक करीत आहेत. अध्यक्ष स्थानि तहसीलदार धनंजय देशमुख उपस्थित होते.