पुसद तालुक्यातील सेवादास नगर येथे 5 सप्टेंबर रोजी विशाल पवार हे शेळ्या घेऊन जात असताना त्यांनी शेळ्याला दगड मारले असता दगड संदीप तुकाराम पवार, कुणाल पवार, अतुल राठोड यांच्या घराच्या ताटयाला लागल्याने वरील आरोपी यांनी संगणमत करून विशाल पवार यांना व त्यांची आईला मारहाण करून जखमी केल्याची घटना घडली आहे. सदर घटने प्रकरणी 6 सप्टेंबर रोजी वसंत नगर पोलीस ठाणे मध्ये तिघांवर विविध कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.