शिरूर अनंतपाळ: पंचायत समितीच्या नरेगा विभागातील कर्मचारी सदानंद नरहारे यांच्या खात्यातून अवघ्या काही मिनिटांत तब्बल 1.47 लाखांची रक्कम गायब झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. नरहारे यांच्या मोबाईलवर Jio-Hotstar सबस्क्रिप्शनसाठी 299 कपात झाल्याचे दिसले. पैसे परत मिळवण्यासाठी त्यांनी गुगलवरून मिळालेल्या तथाकथित ग्राहक सेवा क्रमांकावर संपर्क साधला. फोनवरील व्यक्तीने अत्यंत विश्वास संपादन करत "पैसे परत आले का ते PhonePe किं