जालना जिल्ह्यात आज सर्वत्र गणेश विसर्जन होत असतांना ऑपरेशन सिंदूर सर्वांसाठी आकर्षणाचा आणि चर्चेचा विषय ठरला आहे. त्यावर जालना लोकसभेचे खासदार डॉ. कल्याण काळे यांनी त्या देखाव्याचे कौतुक करुन जालन्याचा हा सांस्कृतीक ठेवा पुढील काळातही कायम ठेवू असे प्रतिपादन डॉ.कल्याण काळे यांनी केले.शनिवार दि.6 सप्टेंबर 2025 रोजी रात्री 9 वा.सिंदूर ऑपरेश च्या देखाव्या प्रसंगी आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.यावेळी माजी खासदार रावसाहेब दानवे, आ. अर्जुनराव खोतकर,माजी आ.कैलास गोरंट्याल आदी उपस्थित होते.