गोंदिया जिल्हा पोलीस दलातर्फे फिट इंडिया मोहीम अंतर्गत पोलीस अधीक्षक गोरख भामरे यांच्या मार्गदर्शनाखाली दिनांक 23 ऑगस्ट रोजी पोलीस मुख्यालय येथून 10 किमी सायकंलीग स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या सायकलिंग स्पर्धेची सुरुवात पोलीस मुख्यालय गोंदियातून करून आयटीआय फुलचूर नाका जयस्तंभ चौक आंबेडकर चौक,नेहरू चौक पर्यंत 5 किमी जाणे व परत नेहरू चौक जयस्तंभ चौक फुलचूर नाका पोलीस मुख्यालय गोंदिया येथे समापन करण्यात आले.