मध्य रेल्वेच्या इगतपुरी रेल्वे स्थानकावर गत काही दिवसांपासून भटक्या कुत्र्यांचा सुळसुळाट वाढला आहे. स्थानकाच्या प्लॅटफॉर्मवर, तिकिट खिडकीजवळ तसेच प्रतीक्षालय परिसरात मोठ्या प्रमाणात कुत्र्यांचे थवे दिसून येत आहेत. यामुळे प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. विशेषतः रात्रीच्या वेळी गाड्या पकडण्यासाठी आलेल्या प्रवाशांना कुत्र्यांचा त्रास अधिक सहन करावा लागत असून, महिलां व लहान मुलांसाठी ही समस्या अधिक गंभीर ठरत आ