परंडा पोलीस ठाण्यात दरोडेखोरांच्या टोळीतील एका सदस्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी धनाजी झकीऱ्या पवार (वय 39 वर्षे, रा. बोंबाळे, ता. खटाव, जि. सातारा) हा दरोडेखोराच्या टोळीतील सक्रिय सदस्य असल्याचे समोर आले आहे. याप्रकरणी वडूज, विटा, आपडीसह विविध ठिकाणी त्याच्याविरुद्ध मोक्का कायद्यान्वये गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. दरम्यान, आरोपीकडून दरोडा, जबरी चोरी, घरफोडी यांसारखे गंभीर गुन्हे घडण्याची शक्यता लक्षात घेऊन पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले.