राज्य शासनाच्या 150 दिवसांच्या विशेष सुधारणा कार्यक्रमांतर्गत अनुकंपा तत्वावर नियुक्तीसाठी पात्र असलेल्या उमेदवारांना नियुक्त्या देण्यासाठी प्रक्रिया राबविण्यात येत आहे. त्याअंतर्गत आज विविध विभागांकडे अनुकंपा तत्वासाठी यादीवर असलेल्या उमेदवारांचा मेळावा जिल्हाधिकारी कार्यालयातील बळीराजा चेतना भवन येथे घेण्यात आला.