चहाच्या दुकानात किरकोळ वादातून झालेल्या भांडणात तरुणाला मारहाण करण्यात आल्याची घटना गुरुवारी (दि. ११) सायंकाळी आमगाव पोलिस ठाण्यांतर्गत ग्राम बोरकन्हार येथे घडली.गुनिलाल दादी पारधी (३८, रा. बोरकन्हार) हा तरुण चहा पिण्यासाठी गावातील दुकानात गेला असता, आरोपी देवराज नत्थू रामटेके (४५, रा. बोरकन्हार) याने त्याला ‘चहा पाज’ अशी मागणी केली. त्यावर गुनीलाल याने नकार दिल्याने दोघांत तोंडी वाद झाला. यानंतर आरोपीने गुनीलाल याला लाथाबुक्यांनी मारहा