नरखेड तालुक्यातील सर्व ग्रामपंचायत सरपंच, उपसरपंच तसेच ग्रामपंचायत कार्यालयातील विविध कर्मचारी यांची नियमित मासिक बैठक आमदार चरण सिंग ठाकूर यांच्या प्रमुख उपस्थितीत उपविभागीय अधिकारी पीयूष चिवंडे यांच्या समवेत पार पडली. या बैठकीदरम्यान ग्रामविकासाशी निगडित महत्त्वाचे विषय, शासकीय योजनांची अंमलबजावणी, तसेच नागरिकांना त्या योजनांचा त्वरित लाभ कसा मिळावा याबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली.