धुळे तालुक्यातील वरखेडी गावातील ६० वर्षीय रमेश रामदास शिंदे यांनी वरखेडी शिवारातील शेतात झाडाला गळफास लावून आत्महत्या केली. ७ सप्टेंबर रोजी सकाळी ही घटना उघडकीस आली. नातेवाईकांनी त्यांना तातडीने हिरे वैद्यकीय महाविद्यालयात दाखल केले, मात्र डॉक्टरांनी मृत घोषित केले. आत्महत्येचे नेमके कारण स्पष्ट झालेले नाही. या प्रकरणी आझाद नगर पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद असून, हेडकॉन्स्टेबल पी. एस. दराडे पुढील तपास करत आहेत.