ज्या ठिकाणी रस्त्याचे काम सुरू आहे तेथे चलान कार्यवाही करू नये अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस तर्फे करण्यात येत आहे. या मागणीचे निवेदन वाहतूक पोलीस उपायुक्त लोहित मतानी यांना देखील देण्यात आले. नागपूर शहरातील अनेक रस्त्यांवर काम सुरू आहे. दरम्यान त्याच्या नागरिकांना मोठा त्रास होतो आहे आणि पोलिसही तेथे चलन कार्यवाही करत आहे यामुळे ज्या ठिकाणी रस्त्याचे काम सुरू आहे त्या ठिकाणी चालन कार्यवाही करू नये.