कळमनुरी तालुक्यातील आखाडा बाळापूर पोलीस ठाणे हद्दीत अवैध दारू ,मटका, गुटखा, जुगार, अवैध वाळू उपसा असे सर्वच प्रकारचे अवैधंदे चालू आहेत, हे अवैध धंदे बंद करण्याची मागणी भाजपा पदाधिकारी,कार्यकर्त्यांनी नांदेडचे विशेष पोलीस महानिरीक्षक यांच्याकडे केली असून यासंदर्भात आज दिनांक 7 सप्टेंबर रोजी आ. बाळापूर भाजपा शहराध्यक्ष गजानन बोंढारे यांच्यासह अन्य कार्यकर्त्यांनी संवाद साधला आहे .