राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गटाचे अल्पसंख्यांक प्रदेशाध्यक्ष आमदार इद्रिस नाईकवाडी हे आज नंदुरबार जिल्हा दौऱ्यावर आले होते. दुपारी नंदुरबार शहरातील जेके पार्क सभागृहात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची बैठक संपन्न झाली. याप्रसंगी विविध पक्षातील कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गटात प्रवेश केला आहे.