उरुळी कांचनकडून निगडीकडे जाणाऱ्या रिक्षातून गांजा वाहतूक करणाऱ्याला जेरबंद करुन लोणी काळभोर पोलिसांनी १२ किलो गांजासह रिक्षा असा ५ लाख रुपयांचा माल जप्त केला आहे.लक्ष्मण राजु पवार (वय ३०, रा. यमुनानगर, सिद्धार्थनगर झोपडपट्टी, ओटा स्किम, निगडी) असे रिक्षाचालकाचे नाव आहे.