गुरुवार रात्रीपासून संततधार पाऊस सुरू आहे. त्यामुळे पालम तालुक्यात शेतीचं नुकसान झालं. शेकडो हेक्टर शेतजमीन पाण्याखाली गेली आहे. तसंच पालम तालुक्यातील लेंडी नदीला आलेल्या पुरामुळे आरखेड, सोमेश्वर, फळा, उमरथडी,घोडा, पुयनी, आडगाव, वणभुजवाडी, तेलाजपूर या नऊ गावांचा संपर्कदिनांक 29 रोजी सकाळी नऊ पासून तुटला. पालम शहराच्या जवळून जाणाऱ्या ओढ्यालाही पूर आला.