जिल्हा परिषद आणि महानगरपालिकेच्या विशेष शिक्षकांच्या समायोजन प्रक्रियेदरम्यान प्राथमिक शिक्षण विभागाचा ढिसाळ आणि संत कारभार पाहून वैतागलेल्या जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम यांनी प्राथमिक शिक्षणाधिकारी कादर शेख यांच्या कारभारावर चिडत “काय फालतूपणा लावलाय” असे म्हणून थेट त्यांनी सभागृह सोडले. सोलापूर जिल्हा परिषदेमधील यशवंतराव चव्हाण सभागृहात सोलापूर जिल्हा परिषद आणि महानगरपालिकेच्या सुमारे शंभरहून अधिक विशेष शिक्षकांच्या समायोजनाची प्रक्रिया सुरू होती.