जिल्ह्यात मटका, जुगार सारखे अवैैध धंदे सुरू आहेत, याबाबतची माहिती मी पोलिसांना दिली होती. मात्र त्यांनी याची दखल न घेतल्यामुळेच मला मटका गोदामावर धाड टाकावी लागली, असा आरोप पालकमंत्री नितेश राणे यांनी आज पत्रकारांशी बोलताना केला. यावेळी पोलिसांच्या कार्यक्षमतेवर त्यांनी जोरदार टीका केली.