कोपरगाव शहरातील समता नगर भागातील नागरिकांनी रस्ते व गटारींच्या कामाच्या मागणीसाठी आज मंगळवार दिनांक 11 सप्टेंबर 2025 रोजी नगरपालिकेचे मुख्याधिकारी सुहास जगताप यांना निवेदन दिले मात्र या वेळी नागरी सुविधा बाबत पालिकेची पोलखोल देखील उघडकीस आली असून निवर्दनकर्त्यांनी यावेळी अधिकाऱ्यांसह मुख्याधिकाऱ्यानाही धारेवर धरल्याचे पहावयास मिळाले. गेल्या १० ते १२ वर्षांपासून समतानागत भागात रस्ते व गटारींचे काम प्रलंबित असून अनेकदा निवेदन दिले तरीही काम न झाल्याची खंत नागरिकांनी व्यक्त केली.