गुरुकृपा लॉन येथे खासदार डॉ. प्रशांत पडोळे यांच्या दौऱ्यावेळी काँग्रेस पक्षाच्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांसह तसेच ग्रामीण भागातील नागरिकांशी सविस्तर चर्चा करण्यात आली. या बैठकीदरम्यान नगरपंचायत व ग्रामपंचायत निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर येणाऱ्या काळातील राजकीय समीकरणांवर विचारमंथन झाले. तहसील प्रशासनाचे कामकाज, एमआरजीएस योजना, घरकुल योजना आणि इतर महत्वाच्या शासन योजनांच्या अंमलबजावणीतील उनिवा तसेच नागरिकांना भेटसावणाऱ्या मूलभूत समस्यावर चर्चा करून तातडीने उपाययोजना करण्याची गरज व्यक्त केली.