माननीय न्यायालय नंदुरबार परिसरातून ३० ऑगस्ट रोजी दुपारी दोनच्या सुमारास कोठडी सुनावणी दरम्यान आणलेला संशयित आरोपी विनोद सुभाष वळवी राहणार ईसाईनगर हा फरार झाल्याची घटना घडली होती. त्याचा परिसरात गावात बस स्थानक परिसर अन्य ठिकाणी शोध घेतला असता तो मिळून आला नाही. याप्रकरणी ३० ऑगस्ट रोजी रात्री शहर पोलीस ठाण्यात पोलीस हवालदार निलेश खोंडे यांच्या फिर्यादीवरून आरोपी विनोद वळवी विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलाय.