Chhatrapati Sambhajinagar, Chhatrapati Sambhajinagar | Oct 6, 2025
दिवाळीच्या तोंडावर हॉकर्सना महानगरपालिका प्रशासनातील अधिकारी व सुरक्षा रक्षक त्रास देत असल्याने भाजपचे आमदार संजय केनेकर हे हॉकर्सना घेऊन पोलीस आयुक्तालयावर धडकले.विक्रेते हे पोलीस आयुक्तालयासमोर ठिय्या मांडून बसले होते.आम्ही निवेदन करण्यासाठी नव्हे तर इशारा देण्यासाठी आलोय हिंदू पथविक्रेत्यांवर जर अन्याय झाला तर पुढील काळात तीव्र आंदोलन उभारू असा इशारा दिला