नायगाव पोलीस ठाणे हद्दीत एका कंपनीत चोरी करणाऱ्या दोन आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे कामं येथील गणेश इंडस्ट्रियल परिसरात असलेल्या कंपनीत मॅनेजर आणि दोन कामगारांनी 12 लाख 68 हजारांचा मुद्देमाल परस्पर चोरी केला याप्रकरणी नायगाव पोलीस ठाण्यात यातीन भप्पा, धवल प्रजापती आणि महादेव करनिया तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. चोरी करणाऱ्या तिघांपैकी दोन आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे. याप्रकरणी अधिक तपास पोलीस करीत आहेत.