मेहकर तालुका काँग्रेस कमिटी आणि शहर काँग्रेसच्या वतीने मेहकर तालुक्यातील शेतकऱ्यांच्या समस्या साठी निवेदन देण्यात आले. मेहकर तालुक्यात सरासरी पेक्षा जास्त पाऊस झाला त्यामुळे ओला दुष्काळ जाहीर करण्यात यावा. संपूर्ण कर्जमाफी घोषित करण्यात यावी, अति पावसामुळे या भागातील पांदन रस्ते वरील अतिक्रमण काढून वरील पांदण रस्ते पक्के करण्यासाठी शासनाने विशेष कार्यक्रम हाती घेण्यात यावा. अशा शेतकऱ्यांच्या मागण्या घेऊन आज मेहकर तहसीलदार काँग्रेसच्या वतीने निवेदन देण्यात आले.