आज दिनांक 3 सप्टेंबर 2025 वार बुधवार रोजी दुपारी 4 वाजेच्या सुमारास बदनापूर तालुक्यातील रोशनगाव येथे लहकू नदीमध्ये पाय घसरून पडून 25 वर्षीय तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे, यामध्ये मयत तरुणाचे नाव जीलानी बाना भाई सय्यद राहणार रोशनगाव असे असल्याचे समोर आले असून सदर घटनेची माहिती पोलीस प्रशासनाला महसूल विभागाला मिळतात घटनास्थळी धाव घेऊन 2 तासाच्या प्रयत्नानंतर मृतदेह वर वर काढून शवविच्छेदन करण्यासाठी ग्रामीण रुग्णालयात घालवण्यात आला असून घटनेची नोंद बदनापूर पोलिसांनी घेतली आहे.