उदगीर येथील विश्वशांती महाबुद्ध विहाराला राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा लातूरचे पालकमंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी ५ ऑक्टोबर रोजी भेट देवून तथागत भगवान गौतम बुद्ध व भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना वंदन केले. यावेळी बुध्द विहार परिसरातील उपलब्ध सोई - सुविधांची पाहणी करुन बुध्द विहार परिसरात इतर सुविधा उपलब्ध करुन देण्यासाठी मी आपल्या सोबत असल्याचे नामदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी सांगितले, समाज बांधवांच्या वतीने शिवेंद्रसिंहराजे भोसले यांचा सत्कार करण्यात आला.