संगमनेरात ७ क्विंटल गोमांसासह कार जप्त; चौघे ताब्यात संगमनेर | शहर पोलिसांनी बुधवारी (दि. २७) मध्यरात्री मोठी कारवाई करत गोमांस वाहतूक करणारी कार पकडली. ज्ञानमाता शाळेसमोर थांबवण्यात आलेल्या (एमएच ०४ एएक्स ५५७१) या कारमध्ये तब्बल ७०० किलो गोमांस सापडले. जप्त मुद्देमालामध्ये गोमांस व कार असा मिळून सुमारे ५ लाख ४० हजारांचा ऐवज पोलिसांच्या ताब्यात आला आहे. अशी माहिती आज सकाळी दहा वाजता पोलीस ठाण्याच्या वतीने देण्यात आले