धुळे महानगरपालिकेच्या प्रारूप प्रभाग रचनेवर देवपूर भागातील नागरिकांनी तीव्र आक्षेप घेतला आहे. बापू भंडारी गल्ली, एकवीरा देवी मंदिर परिसर आणि भाई मदाने नगर या भागांचा समावेश पारंपरिक प्रभाग ५ ऐवजी मुस्लिमबहुल प्रभाग ४ मध्ये केल्याने नाराजी व्यक्त झाली आहे. धार्मिक तेढ निर्माण होण्याची भीती व्यक्त करत नागरिकांनी आयुक्तांना निवेदन दिले. रचना दुरुस्त न केल्यास निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचा इशाराही देण्यात आला.