पुरंदर तालुक्यातील नीरा येथे नीरा बारामती मार्गावर दोन मोटासायकलची समोरा समोर जोरदार धडक झाली. यामध्ये एकाचा जागेवरच मृत्यू झाला. तर तीन जन जखमी झाले आहेत. यामध्ये बंटी सुरेश गमंडे रा.आनंदनगर निबुत या 35 वर्षीय व्यक्तीचा जागेवरच मृत्यू झाला. तर तुकाराम सुखदेव माने (२०) आणि तेजस राहुल शिंदे व इरफान आरिफ सय्यद रा.निंबुत ता.बारामती ,जी.पुणे हे जखमी झाले आहेत.