झडत्या म्हणत भर पावसांत गावागावांत पोळा सण मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. विशेष म्हणजे सकाळ पासून बळीराजा आपल्या जिवलग मित्र बैलाला सजविन्यात व्यस्त होता. दरवर्षी पिठोरी अमावस्येला बैलांचा सण म्हणजे पोळा उत्साहात साजरा होत असून या पोळ्याच्या दिवशी आपल्या जीवाभावाचे साथीदार असलेल्या बैलांप्रती शेतकरी कृतज्ञता व्यक्त करत असतो. वर्षभर शेतात राबणाऱ्या आपल्या बैलांना धन्यवाद मानणारा हा सण गोंदिया गोंदिया जिल्ह्यात उत्साहात पार पडला.