8 सप्टेंबरला दुपारी दोन वाजता च्या सुमारास मिळालेल्या माहितीनुसार आज नागपूर आतील संविधान चौक येथील अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषद च्या वतीने सकल ओबीसी समाजातर्फे मंत्री छगन भुजबळ यांच्या नेतृत्वात आंदोलन करण्यात आले. हैदराबाद गॅजेट नावाखाली शासन निर्णय काढून ओबीसीची फसवणूक केली जात आहे तो जी आर रद्द करावा अशी मागणी यादरम्यान करण्यात आली. महायुती सरकारची सत्ता सुरू असून छगन भुजबळ या सत्तेमध्ये मंत्री आहे. परंतु त्यांच्याच नेतृत्वात मागण्या मान्य करण्यासाठी आंदोलन करण्यात येत आहे.