स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका येत्या दोन महिन्यात होण्याची शक्यता आहे. निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार नगरपरिषद आणि नगरपंचायतीच्या प्रभाग रचनेची प्रक्रिया सध्या सुरू आहे गोंदिया नगर परिषदेच्या प्रभाग रचनेवर 33 जणांनी आक्षेप नोंदवले होते जिल्हाधिकारी प्रजित नायर यांच्या उपस्थितीत या आक्षेपांवर सुनावणी झाली त्यानंतर प्रभाग रचनेचा अंतिम प्रस्ताव नगर विकास मंत्रालयाकडे पाठवण्यात आला आहे नगर विकास मंत्रालय तो निवडणूक आयोगाकडे सादर करेल आणि त्यानंतर अंतिम प्रभाग रचना जाहीर केली जाईल.