सिरोंचा तालुक्यातील सिरकोंडा ग्रामपंचायत अंतर्गत आदिम जमाती विकास कार्यक्रम या राज्यस्तर योजनेनंतर्गत विविध विकास कामांचे भूमिपूजन आज दि.२ सप्टेबंर मंगळवार रोजी दूपारी १ वाजता संपन्न झाले सिरकोंडा येथील रमेश गावडे यांच्या घरापासून ते वेल्ला मडावी यांच्या घरापर्यंत सीसी रोडचे भूमिपूजन तसेच गावातील अन्य विकास कामाचे भूमिपूजन ग्रामपंचायत सरपंच लक्ष्मण गावडे यांच्या हस्ते करण्यात आले.सिरकोंडा ग्रामपंचायत अंतर्गत एकूण 2 कोटीचे प्रत्येकी १५ लाखाचे १४ कामे मंजूर करण्यात आलेली आहेत.