शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या वतीने मेहकर शहरात भव्य ट्रॅक्टर पोळा अत्यंत आनंद आणि उत्साहाच्या वातावरणात पारंपरिक भव्य ट्रॅक्टर पोळा उत्सवाचे आयोजन करण्यात आले. हा सण म्हणजे आपल्या शेतकरी बांधवांच्या कष्टाचे, त्यागाचे आणि मातीतल्या अन्नदात्याच्या निस्वार्थ सेवाभावाचे प्रतीक आहे. म्हणून मेहकर शहरात जानेफळ रोडवरून जाणेफळ चौक, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर वाटिका, कालची बस स्टॅन्ड व शीतला माता मंदिर येथे समारोप करण्यात आला.