📰 आ. कैलास पाटील व खासदार ओमराजे निंबाळकर उपोषणस्थळी दाखल – जरांगे पाटील यांची घेतली भेट मुंबई : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांचे उपोषण सुरू आहे. या उपोषणस्थळी आज आमदार कैलास पाटील आणि खासदार ओमराजे निंबाळकर दाखल झाले. दोन्ही नेत्यांनी जरांगे पाटील यांची भेट घेऊन त्यांच्या तब्येतीची विचारपूस केली. यावेळी आरक्षणाच्या मागण्यांबाबत चर्चा झाली असून, धाराशिव जिल्ह्यातून शेकडो बांधव या आंदोलनासाठी रवाना झाले आहेत