वैतरणानगर परिसरात बिबट्या दिवसाढवळ्या फिरत असल्याने ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण आहे. पाळीव जनावरांवरील हल्ले वाढल्याने नागरिक भयभीत झाले आहेत. या पार्श्वभूमीवर नागोसलीचे उपसरपंच अशोक दत्तू शिंदे यांच्याकडे नागरिकांनी तक्रारी केल्यानंतर त्यांनी वन विभागाशी संपर्क साधून पिंजरा लावण्याची मागणी केली. वरिष्ठ कार्यालयाकडून निधी मिळालेला नसतानाही शिंदे यांनी स्वखर्चाने पिंजऱ्याची व्यवस्था केली. वन विभागाने आज पिंजरा लावला असून लवकरच बिबट्याला जेरबंद करण्यात येईल, असा वि