गिरड, खुर्सापार शेत शिवारात गेल्या वर्षभऱ्यापासून एका वाघानीसह तिच्या तिन पिल्याचा व एका वाघाचा मुक्त संचार सुरू असून आता या वाघानीचे तिनही शावक मोठे झाले असून ते शेतशिवारात फिरत आहे.यातील एका पिल्याने कपाशीच्या शेतात ठिय्या मांडल्याची बातमी कळताच नागरीकांनी वाघाला पाहण्यासाठी शेतीकडे धाव घेतली यावेळी वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी जाऊन वाघाला जंगलाकडे हाकलून लावले.गिरड येथील शेतकरी अरुणराव मोटघरे यांच्या कपाशीच्या पिकात वाघाने ठिय्या मांडला.