परभणी तालुक्यातील धारणगाव येथील तरुण शेतकरी ई - पिक पाहण्यासाठी शेतात जात असताना पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना सोमवार दि. ८ रोजी पहाटे उघडकीस आली.नातेवाईक व ग्रामस्थांनी गजानन डुकरेचा मृतदेह सकाळी आठ वाजता जिल्हाधिकारी कार्यालयात आणून याविषयी जाब विचारण्याचा प्रयत्न केला.दुपारी बारा वाजेपर्यंत मृतदेह जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात होता.