शार्लोट लेक संवर्धनाच्या कामाला गती मनसे आणि माथेरान निसर्ग पर्यटन संस्था यांच्या पाठपुराव्याला यश. माथेरानला पाणीपुरवठा करणाऱ्या ब्रिटिशकालीन शार्लोट लेक या तलावाचे संवर्धानाचे काम राज्य सरकारच्या मुख्यमंत्री तलाव सुशोभीकरण योजनेतून सुरु आहे.तलावातील गाळ काढण्याचे आणि तलाव मजबूत करण्याचे काम माथेरान पालिका कडून नेमलेल्या ठेकेदार यांच्या माध्यमातून करून घेत आहे. दरम्यान या तलावातील गाळ काढण्यात यावा यासाठी माथेरान मधील सामाजिक कार्यकर्ते संतोष कदम आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेने तसेच मा