आमदार अमोल खताळ यांनी केली कोकणगाव–माळेगाव हवेली परिसरातील अतिवृष्टीग्रस्त भागाची पाहणी कोकणगाव/माळेगाव हवेली : तालुक्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे शेतकऱ्यांच्या शेतमालाचे तसेच रस्त्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. या परिस्थितीची माहिती घेतल्यानंतर आमदार अमोल खताळ यांनी आज दुपारी चार वाजता प्रत्यक्ष पाहणी करून शेतकऱ्यांना व ग्रामस्थांना धीर दिला. कोकणगाव येथील संजय भोसले यांचे घर वादळी पावसामुळे कोसळले असून, सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही.