कोपरगाव तालुक्यातील मळेगाव थडी येथे गोदावरी नदी पात्रात पती व पत्नीने उडी घेतल्याची खळबळजणक घटना आज दिनांक २४ सप्टेंबर रोजी घडली आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. रणशूर दांपत्याने गोदावरी नदीपात्रात उडी घेतली असून या दरम्यान सौ रणशूर यांना तरुणांनी वाचविले असून अण्णासाहेब रणशूर हे बेपत्ता असून पोलीस प्रशासन यांच्या माध्यमातून शोधकार्य सुरू आहे.