आज रविवार दिनांक २४ ऑगस्ट २०२५ रोजी दुपारी १२ च्या सुमारास बच्चू भाई शामजी ट्रस्ट आणि दिनेश झाला यांच्याद्वारे प्रमोद महाजन उद्यान, महावीर नगर कांदिवली पश्चिम येथे आयोजित उपक्रमा अंतर्गत, पर्यावरण संवर्धनासाठी आणि शुद्धीकरणासाठी नैसर्गिक कडुलिंबाच्या झाडांची लागवड करण्यात आली. वृक्षारोपण उपक्रमात आमदार संजय उपाध्याय यांनी सहभागी होत हरित आणि स्वच्छ बोरिवली घडविण्याचा संकल्प केला. या उपक्रमात माजी खासदार गोपाल शेट्टी, भाजपा पदाधिकारी, कार्यकर्ते आणि स्थानिक नागरिक देखील उपस्थित होते.